Pravachan 24-01-2013 on "AMBADNYA"

Hariom Pravachan 24/01/2013 परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.०१.२०१३) ॥ हरि ॐ॥ श्रीस्वस्तिक्षेम संवाद आधी साधायचा आहे. आज आपल्याला नेहमीचाच प्रवास करताना थोडसं एक विश्रांतीचं, अभ्यासाचं स्थान घ्यायचं आहे. थोडासा अभ्यास करायचा आहे. आपण उपनिषदामध्ये ‘अंबज्ञ’ शद्ब वाचला. हा कुठल्या व्याकरणातून बनलेला शद्ब नाही. ती माता ‘दत्तज्ञ’ आहे, ती कृतज्ञ आहे, तसा हा परमात्मा ‘अंबज्ञ’ आहे, आईच्या चरणी कृतज्ञ म्हणजे ‘अंबज्ञ’ आहे. आपली कोणी स्तुती केली की आपण ‘श्रीराम’ म्हणतो Thanks ऐवजी ‘अंबज्ञ’ म्हटलं तर ज्याला म्हणतो त्याचा आणि आपलाही फायदा आहे. हा शद्ब आपल्या रोजच्या वापरात यायला हवा. प्रसन्नोत्सवाच्या तयारीच्या वेळी आपण ‘विच्चै’ शद्ब बघितला. ‘विच्चै’ क्रियापद नाहीए, अव्यय आहे. अव्यय म्हणजे जे बदलत नाही ते. जो शद्ब कर्त्याच्या काळानुसार, लिंगानुसार रूप बदलत नाही. ज्याचा व्यय होत नाही ते अव्यय. हा शद्ब कुठल्या ही मंत्रात येऊ शकत नाही, कारण हा सिद्ध केलेला आहे. देवासाठी भक्त जे-जे करू इच्छितो ते सगळं विच्चैकारातून येतं. विच्चैकाराचा गजर आपण गुरुक्षेत्रम्...