परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१३.१२.२०१२)

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१३.१२.२०१२) ॥ हरि ॐ॥ ॥ ॐ मंत्राय नम: ॥ ॥ ॐ रामात्मा श्री दतात्रेयाय नम: ॥ अंकुर मंत्राचे प्रथम पाद चालू आहे. आपण रामभरोसे शब्द वापरतो. रामभरोसे हा शब्द केव्हा वापरला जातो ? ज्याचा जराही आगा पिछा माहीत नाही तरीही अधिक विचार न करता विश्वास ठेवून पुढे जाणे म्हणजे म्हणजे रामभरोसे. कुठेतरी भारतीय संस्कृतीला माहिती आहे की रामावर विश्वास ठेवला की सगळं सुरळीत होतं , मार्ग सुकर होतो. कुठलीही भाषा असली तरी जेव्हा माणूस मृत्यू पावतो. तेव्हा "राम" उच्चारले जाते. भूत/तत्सम काही भयावह दिसलं की राम राम राम राम म्हटलं जातं. म्हणजेच काय जेव्हा भीती वाटते तेव्हा रामानाम उच्चारले जाते. खरं सांगतो जो रामभरोसे जगतो तोच खरा जगतो. राम : ह्या विश्वातील पुरुषार्थ करण्याचा मूळ स्त्रोत म्हणजे राम. (येथे पुरुष म्हणजे आत्मा) रामभरोसे पुरुषार्थ करण्यासाठी जे सामर्थ्य लागते , त्या सामर्थ्याचा मूळ स्त्रोत म्हणजे राम. एखादा जीव स्त्री किंवा पुरुष म्हणून जन्माला आल्यावर त्याला त्याच्या जीवनात ध्येय गाठण्यासाठी जे प्रयास करावे लागत...